हॅलो, मी एकनाथ शिंदे बोलतोय..! थेट मंत्र्यांना फोन vipmehkar
शेवगाव (जि. अहिल्यानगर) : सभेतून थेट मंत्र्यांना फोन लावण्याचा नवा फंडाच झाला आहे,
असे स्वतःच सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मंत्री उदय सामंत व गुलाबराव पाटील यांना फोन लावला. 'हॅलो, मी एकनाथ शिंदे बोलतोय..
' असे म्हणत शेवगावचा पाणीप्रश्न व एमआयडीसीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश शिंदे यांनी दोन्ही मंत्र्यांना दिले. नगरपरिषद प्रचारार्थ शनिवारी शिंदे यांची सभा झाली.
शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला की लगेच प्रशासकीय इमारत, पाणी, उत्तम रस्ते व एमआयडीसी मार्गी लावण्याचा शब्द देतो, असे ते म्हणाले. उदगीर येथे सभेत
भाषण सुरू असताना उदगीरच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना मोबाइलवरून त्यांनी सूचना केली.












0 Comments:
एक टिप्पणी भेजें